मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर याच्या 50 व्या वाढदिवसाची पार्टी एक सुपर-स्प्रेडर इव्हेंट ठरली आहे. कारण जवळपास 55 स्टार कलाकार पाहुण्यांना कोविड-19 ची लागण झाली आहे. करण जोहर याच्या पार्टीत कोरोनाचा स्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे. 55 बॉलिवूड सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाल्याने बॉलिवूडमध्ये हादरा बसला आहे. आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या विळख्यात आता अभिनेता शाहरुख खानचं देखील नाव समोर येत आहे. शाहरुख खान सुद्धा करण जोहरच्या पार्टीत हजर होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सहभागी झाले होते. त्यानंतर 1 जून रोजी कार्तिक आर्यन आणि कतरिना कैफ यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान या पार्टीतील अनेक सेलिब्रेटिना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा आहे. 


मुंबईतील अंधेरी वेस्ट येथील यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये करण जोहर याने त्याचा 50 वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. हृतिक रोशन , शाहरुख खान , कतरिना कैफ , कियारा अडवाणी, जान्हवी कपूर, मलायका अरोरा, करीना कपूर खान यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावली होती.